सातारा : पुसेगाव, ता. खटाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने 7 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. या चोरीची फिर्याद राजाराम नामदेव वसव वय 66 रा. भवानीनगर, पुसेगाव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
प्राप्त फिर्यादीनुसार, फिर्यादी वसव हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून काही कामानिमित्त ते मंगळवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त महाबळेश्वरला गेले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षक कॉलनी भवानीनगर येथील घर बंद होते. त्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. ही चोरी मंगळवारी सायंकाळी पावणे सात ते बुधवारी सकाळी पावणेसात या दरम्यान झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून त्यामधील एक लाख वीस हजार रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या, चाळीस हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चैन, एक लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, चाळीस हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याचे झुबे, वीस हजार रुपये किंमतीची हातातील सोन्याची एक अंगठी, 80 हजार रुपये किंमतीचा एक सोन्याचा नेकलेस, 80 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार, एक लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व 61 हजार रुपये रोख असा 7 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला आहे.
बुधवारी दुपारी वसव आणि त्यांचे कुटुंबीय माघारी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार एस. एस. येवले अधिक तपास करत आहेत.आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |

'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |