मेडिकल कॉलेजच्या रोजगारात भूमिपुत्रांना संधी देणार

कामेश कांबळे; खेड गटाच्या विकासासाठी ५० ते ६० कोटींची कामे प्रस्तावित

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : मेडिकल कॉलेजमधील विविध पदांच्या भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांनी सांगितले. तसेच खेड गटातील विकासकामांसाठी ५० ते ६० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा परिषद व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून खेड गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये विविध पदांसाठी कुशल व अकुशल कामगारांची भरती होणार असून, त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
खेड जिल्हा परिषद गटाच्या पंचायत समितीची सभा संगमनगर येथील कार्यालयात कामेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैया भोसले, कृषी व पशुसंवर्धन सभापती नीता कर्णे, जिल्हा परिषद सदस्या नीता खरात, पंचायत समिती सदस्य कोमल गायकवाड, राणी पवार, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सतीश चव्हाण, बाळासाहेब खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खेड गटातील विकासाचा अनुशेष दूर करून मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. बॉम्बे रेस्टॉरंट ते संगमनगरी रस्त्यावर नवीन बसस्थानक उभारून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच बॉम्बे रेस्टॉरंट ते संगमनगरी रस्त्यावरील बंद पथदिव्यांची वीजबिले जिल्हा परिषदेमार्फत भरण्याचा निर्णय झाला असून, महावितरणने पथदिवे तातडीने सुरू करावेत, असे कांबळे यांनी सांगितले.
खेड गटातील विविध विकासकामांसाठी ५० ते ६० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी घेतली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कामेश कांबळे यांना खेड गटाच्या विकासासाठी विविध ठिकाणी संघर्ष करावा लागला; मात्र त्यांनी कामातून माघार घेतली नाही. त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून, त्यांनी गटात उल्लेखनीय कामे सुरू केली आहेत, असे राजू भैया भोसले यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब खरात, माजी सरपंच पिंटू गायकवाड, अजित गायकवाड, निखिल यादव, सुधीर काकडे, प्रियंका सपकाळ, सुशीला कांबळे, शोभा फडतरे, अश्विनी कदम, रतन सावंत, सत्यवान जाधव, रमेश साळवे, जयाभाऊ जाधव, किशोर डांगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव; प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत दि. 18 सप्टेंबर

संबंधित बातम्या