सातारा : कोरेगाव शहरात भरवस्तीत एका वृद्धाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव येथील भगवा चौकात बर्गे डेअरीसमोर सिमेंटच्या बाकड्यावर बसलेल्या 81 वर्षाच्या वृद्धाचे 1 लाख 10 हजारांची चेन व रोख रक्कम हिसकावून अज्ञात तिघांनी पोबारा केला. तुकाराम राजाराम अहिरेकर (वय 81, रा. सुभाषनगर) यांनी फिर्याद दिली. दि. 20 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते बसले असताना दोन अनोळखी तेथे आले. त्यांनी अहिरेकर यांच्या गळ्यातील चेन हिसकावून मारहाण केली. तसेच जवळच दुचाकीवर थांबलेल्या तिसर्या अज्ञातासोबत बसून ते पळून गेले. घटनास्थळी उपाधीक्षक सोनाली कदम यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. तपास उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.