सातारा : सातारमधील अजंठा चौकात सुरू असणाऱ्या अल्पवयीनांचा विवाह रोखण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी साताऱ्यातील अजंठा चौक परिसरातील एका घरात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो रोखण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे आणि मुलाचे कुटुंबीय असे मिळून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.