08:40pm | Nov 28, 2024 |
सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार तसेच जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्वर्गीय शिवराम माने (गुरूजी) यांच्या तृतीय पुण्यस्मृतीदिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या वतीने, संस्थापकांच्या तयार करण्यात आलेल्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळयाची भव्य सवाद्य मिरवणूक देगांवफाटा ते संस्था मुख्य कार्यालय माने कॉलनी, सातारा. या मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये संस्थेचे संचालक, शाळेतील विविध कमिटीचे पदाधिकारी, संस्था हितचिंतक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. ढोल पथकाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत संस्थापकांच्या अर्धाकृती पुतळयाची भव्य मिरवणूक संपन्न होते वेळी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा आणि मिरवणूकीसमोर संपूर्ण रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यामूळे संपूर्ण देगांव रस्त्याला उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते.
संस्थापकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, संस्थेच्या अत्यंत बिकट आणि खडतर परिस्थितीमध्ये संस्थापकावर अढळ निष्ठा व विश्वास ठेवून सेवा-कर्तव्य पार पाडणार्या कार्यरत कर्मचार्यांचा सत्कार सोहळा त्याचप्रमाणे या कर्मचार्यांना कुटुंबातून पाठबळ, संस्कार देणार्या कर्मचार्यांच्या माता-पिता यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा आ. महेशदादा शिंदे यांच्या भगिनी मा. डॉ. सौ. अरूणाताई बर्गे यांच्या शुभहस्ते गृहविभागाचे मंत्रालयीन कक्ष अधिकारी राजाराम शिर्के साहेब, जि. प. साताराचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी जि. प. सदस्य संदिपभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मानपत्र, मानाचा फेटा, संपूर्ण पोशाख असे या सत्काराचे स्वरूप होते.
संस्थेच्या वतीने छत्रपती शिवरायांचा जाज्वल इतिहास विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावा, त्याचप्रमाणे छत्रपतींच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय दशेतच व्हावी या हेतूने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या ‘शिवकला चषक सुंदर किल्ले सजावट स्पर्धेचा’ बक्षीस वितरण समारंभ देखील यावेळी संपन्न झाला. यावर्षी या स्पर्धेची व्याप्ती वाढविल्यामूळे व्यापक स्वरूपामध्ये स्पर्धेमध्ये, संस्थेच्या शाखांच्या परिसरातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा मधील सुमारे 850 स्पर्धक सहभागी झाले होते. संस्थेमाफर्र्त दिपावली पाडव्या दिवशी विविध टीमच्या माध्यमातून परीक्षण करण्यात येऊन विजेत्यांची निवड करण्यात आली होती. तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या 30 विद्यार्थ्यांना, ‘‘स्मृतीचिन्ह, रोख रक्कम’’ मान्यवरांच्या हस्ते देऊन विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव या प्रसंगी करण्यात आला.
विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेमध्येच बालवयापासूनच ‘सामाजिक बांधिलकीची जाण व्हावी’ आणि ‘समाजातील प्रश्नांचे भान व्हावे यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘एक मूल एक मूठ धान्य व जुन्या परंतू वापरण्यायोग्य कपडयांचे संकलन’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांमधून संस्थेच्या सर्व शाखांमधून मोठया प्रमाणात धान्य तसेच विविध प्रकारचे कपडे संकलित करण्यात आले होते. या संकलित झालेल्या 1.5 टनाहून जास्त धान्यांचे आणि एक हजार हून जास्त कपडयंाचे वितरण, ‘भारतमाता आदिवासी-पारधी समाज वस्तीगृह दत्तनगर मोहोळ ता. मोहोळ जि. सोलापूर’ या संस्थेकडे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या प्रसंगी संस्थेचे हितचिंतक, सामाजीक कार्यकर्ते सुभाष ज्ञानदेव कदम आणि सातार्यातील सुप्रसिध्द उदयोजक बाळासोहब गोनुगडे यांनी संस्थेच्या श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली शाळेस प्रत्येकी 1 ऍन्ड्रॉईड टी. व्ही. संच भेट दिले. या देणगी बदद्ल दोघांचाही या वेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येऊन, त्यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. अरूणाताई बर्गे मॅडम् यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, इतर शैक्षणिक संस्था कर्मचार्यांना निव्वळ राबवून घेत असताना ‘या संस्थेने, संस्थेच्या जडण घडणीत योगदान देणार्या कर्मचार्यांबरोबरच, या कर्मचार्यांच्यावर संस्कार करणार्या त्यांच्या माता-पिता यांचा देखील सन्मान केला.’ ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून, हा उपक्रम कर्मचारी व त्यांच्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा इतर संस्थांना मार्गदर्शक ठरणारा आहे. या उपक्रमांमूळे सर्व कर्मचारी निश्चितपणे समर्पणाच्या भूमिकेतून आदर्शवत सेवा कतर्र्व्य पार पाडून संस्थेचा नावलौकिक अबाधित ठेवतील असा आशावाद व्यक्त करून इतर संस्थांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार महेशदादा शिंदे सदैव व कायम संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे राहतील याची त्यांनी याप्रसंगी आर्वजुन ग्वाही दिली.
सर्व कर्मचार्यांच्या वतीने सत्कारास उत्तर देताना ‘‘श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली शाळेच्या मुख्याध्यापिका कु. मानिषा कदम, यांनी संस्था कार्याचा आढावा घेऊन, या संस्थेत काम करताना आम्हा कर्मचार्यांना परकेपणाची कधीच जाणीव करून दिली जात नाही, सर्व कर्मचारी आपलेपणाने, एकाच कुटुंबाचे घटक असल्याप्रमाणे शिस्तबध्द आणि प्रामाणिक सेवा कार्य पार पाडत आहेत, असे नमुद करून त्यांनी अश्वसित करून ग्वाही दिली की ‘‘आम्हा कर्मचार्यांकडून कधीही संस्थेस गालबोट लागू देणार नाही.’’ सलिम मुलाणी यांनी सुध्दा या प्रसंगी समयोचीत भाषण केले.
तसेच याप्रसंगी उपस्थितीतांसाठी संस्था व माने-जाधव परिवार यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ उपस्थित मान्यवर, संस्था हितचिंतक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. प्रतिभा जाधव यांनी केले. प्रास्ताविक खजिनदार दत्तात्रय काळे यांनी केले. आभार कु. वैशाली भिसे यांनी मानले. कार्यक्रमास कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती भोसले, संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सतीश माने, समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शुभांगी डोर्ले, चिखली गावचे माजी सरपंच गोपाळ आप्पा शिर्के, सुरेश शिर्के, कुसवडे गावचे माजी सरपंच सुनिल महाडिक, विश्वनाथ सराटे, योगेश बल्लाळ, संभाजीनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाष मगर, सदस्य जयंवत मोरे, अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खरात, ऍड. नितीन शिंगटे, संस्थेचे माजी संचालक शिरिष जंगम, डी. एम. माने, हरिदास जाधव, कोडोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य रामदास साळुंखे, खिंडवाडी पोलिस पाटील सौ. सुरेखा कदम, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अमोल काटे, शामराव पवार परिवहन कमिटीचे अध्यक्ष दादा जाधव, सौ. नम्रता कुडाळकर, सौ. सबरीन आतार, संभाजी टकले, सौ. मोनिका सुतार, सौ. जयश्री जाधव, सौ. समृध्दी जाईल, सौ. काजल जगताप, सदस्या सौ. अंकिता चव्हाण, सौ. पुनम चव्हाण, सौ. सनिता शिंदे, सौ. स्वाती सोनटक्के, सौ. रिहाना शेख, सौ. अफरोज शेख, सौ. तसलीम इनामदार, सदस्य आनंदा दानवले, अंकुश साळुंखे, सतोष रासकर, अमोल साळुंखे, माता-पालक संघाचे पदाधिकारी, परिसरातील विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक, पालक, गा्रमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |