सातारा : लोखंडी पाईपने मारहाण करून एकास जखमी केल्याप्रकरणी चार जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास दीपक बाळकृष्ण सावंत रा. गडकर आळी, सातारा यांना लोखंडी पाईप ने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच मोन्या कदम, शंभू कदम, कृष्णा कदम, आतिष कदम यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.