तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर करेल जादू !

तुरटीच्या फेसपॅकपासून टोनरपर्यंत त्वचेसाठी 'असा' करा वापर...

by Team Satara Today | published on : 13 June 2025


सुंदर, नितळ आणि देखणी त्वचा कायमच सगळ्यांना आवडते. परंतु आपल्यापैकी अनेकजणींना त्वचेशीसंबंधित काही ना काही समस्या सतावतात. त्वचेवर काळे डाग, मुरुम, पुटकुळ्या, पिंपल्स येणं, त्वचा काळवंडणे असे असंख्य स्किन प्रॉब्लेम्स असतात. त्वचेच्या अनेक लहान - मोठ्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी आपण महागातले ब्यूटी प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर लावतो. परंतु, काहीवेळा त्यामुळे आपल्याला फारसा काही फरक पडत नाही. अनेकदा महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्समुळे स्किन प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी अधिकच वाढतात. यासाठीच, स्किन प्रॉब्लेम्सवर घरगुती उपाय करणे कधीही उत्तमच

आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये तुरटीचा एक छोटा खडा हमखास असतोच. तुरटी फक्त पाण्यातील घाण स्वच्छ करण्यासाठी नाही तर चेहरा स्वच्छ करण्यासाठी देखील तितकीच फायदेशीर ठरते. तुरटी ही पोटॅशियम आणि ॲल्युमिनियम सल्फेटपासून बनलेला नैसर्गिक खनिज आहे. तुरटी तिच्यातील अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि तुरट गुणधर्मामुळे ओळखली जाते. तुरटीतील हे सगळेच गुणधर्म त्वचेच्या कोणत्याही विकारावर उपाय म्हणून फायदेशीर ठरतात. तुरटीचा त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून नेमका वापर कसा आणि कोणकोणत्या पद्धतीने करायचा ते पाहूयात. 

त्वचेसाठी तुरटी वापरण्याच्या साध्यासोप्या ५ पद्धती... 

१. तुरटीचे पाणी :- सकाळी उठल्यानंतर थंड तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. एक लिटर पाण्यात १ चमचा तुरटी पावडर मिसळा. या पाण्याने त्वचा  धुतल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होते, ओपन पोर्स बंद होतात आणि त्वचेतील जास्तीचे तेल काढून टाकले जाते.  

२. तुरटीचा फेसपॅक :- सगळ्यांतआधी तुरटीची बारीक पावडर तयार करा. ही पावडर एका बाऊलमध्ये घेऊन त्यात गुलाबपाणी किंवा मध मिसळून घ्यावे. हे सगळे मिश्रण कालवून एकजीव करावे तुरटीचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक त्वचेवर लावून १५ ते २० मिनिटे तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा उपाय आठवड्यातून किमान २ वेळा केल्याने त्वचेवरील काळे डाग निघून जाऊन त्वचा उजळ व चमकदार होते. 

३. तुरटीचे टोनर :- एका मोठ्या बाऊलमध्ये २ ते ३ टेबलस्पून तुरटीची बारीक पूड घेऊन त्यात २ ग्लास पाणी ओतावे. आता चमच्याने हलवून तुरटीची बारीक पूड पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. हे पाणी एका बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. एका कापसाच्या बोळ्यावर हे तयार पाणी घेऊन त्वचेवर टोनर म्हणून वापरावे. तुरटीच्या पाण्याचाच आपण टोनर म्हणून देखील वापर करु शकतो. या उपायामुळे त्वचेचे पोर्स खोलवर स्वच्छ होऊन त्वचा सुंदर दिसू लागते, यासोबतच, सैल पडलेल्या त्वचेला टाईट करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. 

४. तुरटीचे स्क्रब :- एक बाऊलमध्ये तुरटीची बारीक पूड घेऊन त्यात बेसन किंवा चंदन पावडर मिसळा. तुरटीचा स्क्रबिंग मास्क तयार आहे. हा तयार स्क्रबिंग मास्क त्वचेवर लावून हलक्या हाताने चोळून मसाज करावा. २ ते ३ मिनिटे मसाज केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. या स्क्रबमुळे डेड स्किन निघून जाऊन त्वचा उजळ आणि सुंदर दिसते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आडनावाबद्दल चर्चेत
पुढील बातमी
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट'

संबंधित बातम्या