ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

by Team Satara Today | published on : 24 December 2024


सातारा : गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य  गोंदवलेकर   महाराजांचा पुण्यातिथी उत्सव कार्यक्रम २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार  आहे. यानिमित्ताने  पोलीस अधीक्षक समिर शेख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 195  चे कलम १३१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये   वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये या करिता खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदल केलाआहे.

सातारा ते पंढरपूर जाणारा रोड पिंगळी बु. गावचे हदृीतील खांडसरी चौक ते गोंदवले बु. गावातील आप्पा महाराज चौकापर्यंत बंद राहील. या करिता पर्यायी मार्ग पुढिलप्रमाणे, सातारा कडून पंढरपूर अकलूजकडे जाण्याकरिता पिंगळी बु. गावचे हदृीतील खांडसरी चौक ते दहिवडी मार्गे राणंद, मा‍र्डि वरुन म्हसवड मार्गे जाणारा पंढरपूर रोड,पंढरपूर बाजुकडून साताराकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणी मार्गे सातारा अथवा म्हसवड ते शिंगाणपूर फलटण मार्गे सातारा असा तयार करण्यात आला आहे.

वाहतुक मार्गात केलेल्या बदलाचीं सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुशासन सप्ताहानिमित्त गांव की और कार्यशाळा संपन्न
पुढील बातमी
न्यू इंग्लिश स्कूल चा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वार्षिक क्रीडामेळावा 2024 उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या