वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळकं फोड आंदोलन संपन्न

सातारा : जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर याच टाळकं फोड आंदोलन करण्यात आले.    

जिल्हा महासचिव गणेश भिसे यांनी बोलताना सांगितले की, "रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महामानव समस्त बहुजन समाजाचे आणि भारत देशाची अस्मिता आहेत. परंतु काही जातीवादी, धर्मांधशक्ती वारंवार महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. समाजस्वास्थ बिघडवण्याचे काम करीत असतात. मनुवादी व सनातनी प्रवृत्तीचे राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्यावरून सुटकेचा प्रसंगाविषयी बोलताना महाराजांनी लाच देऊन त्यांची सुटका करून घेतली होती. अशा पद्धतीचे इतिहासाचे विद्रुपीकरण करणारे व खोटा इतिहास बहुजनांच्या माथी मारणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जाणीवपूर्वक प्रश्न निर्माण करण्याचा कुटील डाव मनुवादी व सनातनी प्रवृत्तीचे राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या बाबतीत सुद्धा एकेरी उल्लेख करत जाणीवपूर्वक आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. अशा जातीवादी धर्मांधशक्ती वेळीच रोखल्या पाहिजेत."

टाळकं फोड आंदोलनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे नाठाळाच्या माथी हाणू काठी ! या प्रतिकात्मकरीत्या राहुल सोलापूरकर यांच्या कपाळावर काठया हाणून त्याचे डोके ठिकाणावर आणण्याचं काम टाळकं फोड आंदोलनाच्या माध्यमातून केले आहे. वंचितच्यावतीने शासन व प्रशासन यांना निवेदनाद्वारे कळवले आहे की, "सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर येत्या आठ दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी देशद्रोहाचा आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला पाहिजे. अन्यथा, प्रत्यक्षात राहुल सोलापूरकर याचे टाळक वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी." यावेळी गणेश भिसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष संदिप कांबळे, बबनराव करडे, शशिकांत गंगावणे, रवींद्र वायदंडे, दिपक चव्हाण, सतीश कांबळे, दिपक धडचिरे, सुहास पुजारी, अन्सारभाई पटेल, हाजी मोगल पालकर, सातारा तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत, महासचिव विशाल आव्हाड व त्यांची टीम, वाई तालुकाध्यक्ष विजय वानखेडे व त्यांची टीम, कराड उत्तर तालुकाध्यक्ष सुरेश बैले, महासचिव अधिकराव सोनवले व त्यांची टीम, युवा आघाडी महासचिव सायली भोसले, उज्ज्वलाताई वानखेडे,  युवा कार्यकर्ते प्रशांत किर्तिकुडव, अमन मुलाणी, सुदर्शन मोहिते, मुकुंद काळे, राजू बाबर यांच्यासहित जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

मागील बातमी
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद
पुढील बातमी
मुंबईत फर्निचर मार्केटला भीषण आग

संबंधित बातम्या