सातार्‍यात संगमनगर परिसरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 17 July 2026


सातारा : शहरातील संगमनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 जुलै ते 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान चाहूरखेड, गजानन पार्क, संगमनगर (सातारा) येथील रहिवासी प्रभाकर मल्हार इनामदार (वय 69, सेवानिवृत्त शिक्षक) यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेल्या पर्समधून 8 हजार रुपये किमतीची सुमारे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची बाल अंगठी तसेच 5 हजार रुपये किमतीचे सुमारे 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सावजी अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे फाटा परिसरातील मोना स्कूलसमोर कारची मोटारसायकलला धडक; चौघांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
पाटखळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

संबंधित बातम्या