सातारा : यादोगोपाळ पेठ येथे विवाहितेच्या खून प्रकरणातून बहिणीच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक अनिलकुमार पाटील व श्रेयस अनिलकुमार पाटील (दोघे रा. करंजे, सातारा) यांच्या विरुध्द महेश भानूदास शिंदे (वय 42, रा. पानमळेवाडी पो.वर्ये ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे.अंजली शिंदे या विवाहितेचा खून झाल्याप्रकरणी पती राजेंद्र शिंदे याला अजंलीचे दोन्ही भाउ अभिषेक व श्रेयस यांनी रागाच्या भरात पाईप, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. राजेंद्र शिंदे याच्यावर उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026