दुकानातून 72 हजारांच्या साहित्याची चोरी

सातारा : महामार्गावरील एका दुकानातून अज्ञात चोरट्याने सुमारे 72 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील महामार्गावरील महिंद्रा हॉटेल शेजारी असलेल्या रंगवाला.कॉम या दुकानात अज्ञाताने चोरी केली. दुकानातून लॅपटॉप, प्लंबिगंचे साहित्य असे 72 हजारांचे साहित्य चोरुन नेले. दि. 9 रोजी रात्री घरफोडीची घटना घडली. सातारा शहर पोलीस ठाण्यात अभिजीत अविनाश सावंत (वय 23, रा. कोकराळे, ता. खटाव, सध्या रा. चाहूर, खेड, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.



मागील बातमी
सुरक्षारक्षकाला मारहाण; एकावर गुन्हा
पुढील बातमी
महिलेला मारहाण प्रकरणी तीनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या