राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू; अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा  :  अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च व विशेष अध्ययनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत राबविण्यात येत  आहे.

या शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) “ताज्या घडामोडी” या विभागात प्रसिद्ध करण्यात आलेली सविस्तर जाहिरात पाहून अर्ज करावा.

अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज दि. १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत https://ts.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची छापील प्रत समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे – ४११००१ येथे पाठविणे बंधनकारक आहे.

याशिवाय अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे DigiLocker द्वारे अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अपूर्ण किंवा उशिरा सादर झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन  सहायक आयुक्त, समाज कल्याण  सुनिल जाधव यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा सिंचन मंडळाच्या वतीने 'आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा' उत्साहात ; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले आपत्कालीन बचावाचे धडे
पुढील बातमी
खरीप २०२६ साठी साताऱ्यात खतांचा मुबलक साठा; टंचाईची शक्यता नाही - कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे

संबंधित बातम्या