07:45pm | Sep 14, 2024 |
सातारा : वकिलीत स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर स्वतंत्र ओळख निर्माण करत असताना ॲड.डी.व्ही. पाटील यांनी विविध सामाजिक चळवळीद्वारे शोषित, पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठीही दिलेला लढा-योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन ॲड. राजेंद्र गलांडे यांनी आज सातारा येथे केले.
प्रसिद्ध विधीज्ञ धैर्यशील ऊर्फ डी. व्ही. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ते 'ॲड. डी. व्ही. पाटील यांची "आंदोलने आणि चळवळी" 'या विषयावर बोलत होते. सातारा येथील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब सोमण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. विजय मांडके होते.
पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा धावता आढावा घेत ॲड.गलांडे यांनी सांगितले की, डी. व्ही. पाटील हे कॉम्रेड व्ही. एन. पाटील यांचे सुपुत्र होत. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा मुलगा ही ओळख काहीवेळा त्या मुलावरती अन्याय करणारी ठरते. अशावेळी स्वतःची ओळख निर्माण करणे कठीण ठरते. परंतु डी.व्ही.पाटील यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्याने आणि व्यासंगाने आपली स्वतंत्र ओळख देशभर निर्माण केली. धारदार आवाज, जोडीला सोपे परंतु प्रभावी इंग्रजी, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि न्यायालयात वावरताना न्यायालयीन आचारसंहितेचे काटेकोर पालन, हे डी.व्ही पाटील यांच्या व्यावसायिक यशाचे गमक मानावे लागते. यातून ते या व्यवसायात येणाऱ्या नव्या पिढीपुढे आदर्श ठरले.
ॲड. गलांडे पुढे म्हणाले, वडिलांसह अनेक चळवळीतील मान्यवरांच्या सहवास संस्कारातून डी. व्ही. डाव्या विचारांकडे झुकले. यातूनच ते विविध चळवळी आंदोलनात सहभागी होताना पीडित-शोषित जनतेला न्याय देण्याकामी प्रयत्नशील राहिले. कोल्हापूर खंडपीठ लढा, नगरपालिका कर्मचारी, धरणग्रस्त - कष्टकऱ्यांच्या विविध चळवळीतील पाटील यांच्या योगदानाचा गलांडे यांनी यावेळी मागोवा घेतला.
अध्यक्षस्थानावरून कॉ. विजय मांडके म्हणाले, कष्टकऱ्यांच्या-उपेक्षितांच्या चळवळीतला दादा माणूस म्हणून डी. व्ही. पाटील यांच्याकडे पहावे लागेल. एवढेच नव्हे तर देशभर सर्व धर्म - समाज घटकात सलोखा रहावा यासाठी त्यांनी प्रसंगोपात केलेले मार्गदर्शनही मोलाचे ठरले आहे.
ॲड. वसंत नलावडे यांनी प्रास्ताविक केले. कॉ.त्र्यंबक ननावरे यांनी स्वागत केले. कॉ. विजय निकम यांनी आभार मानले. सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. सीताराम येंचुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध कामगार संघटनेचे, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |