दोन मोटर सायकलच्या अपघातात एकजण ठार, एक गंभीर

by Team Satara Today | published on : 20 April 2025


वडूज : येथील पेडगाव रस्त्यावरील पेडगाव गावच्या हद्दीत दोन मोटर सायकलच्या समोरा समोरील धडकेत वडूजचा युवक सुहास राजेंद्र गुजले (वय २७) हा जागीच ठार झाला, तर दशरथ नवनाथ जाधव (रा. पेडगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की , शुक्रवार दि. १८ रोजी सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास पेडगाव गावच्या हद्दीत वडूज रस्त्यावर देवीदास कुंडलिक मिसळे यांच्या जमिनी शेजारी डांबरी रस्त्यावर मोटार सायकल क्रमांक एम एच ११ बी क्यू ४३५ व दुचाकी क्रमांक एम एच ११ सीटी १५७८ वरील चालक दशरथ नवनाथ जाधव (रा. पेडगाव ता. खटाव ) याने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने , अविचाराने , रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात येऊन सुहास राजेंद्र गुजले ( वय २७ ) रा. वडूज  यास गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अमर अंकुश पाटोळे रा . वडूज यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मैत्रीच्या अध्यायाने साहित्य, पत्रकारितेची उंची वाढली
पुढील बातमी
सोलरसाठी जास्तीचे पैसे देऊ नयेत

संबंधित बातम्या