शेतकर्‍यांच्या गोठ्यातून जनावरे चोरणारी पिकअप गँग भुईंज पोलिसांकडून जेरबंद; चार गुन्हे उघडकीस

by Team Satara Today | published on : 28 July 2026


सातारा : भुईंज, कुडाळ, बावधन परीसरातील शेतकर्‍यांच्या गोठ्यातून जनावरे चोरी करणारी पिकअप गँग जेरबंद करण्यात भुईंज पोलिसांना यश आले आहे. संबंधित चोरट्यांकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

सुरेश ऊर्फ सुर्यकांत आनंदराव चव्हाण (रा. पाचवड, ता. वाई), संदेश हणमंत पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई), हर्षद हिंदुराव चव्हाण (वय 18 वर्षे, रा. कडेगांव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 जून रोजी मध्यरात्रीच्या दरम्याण कवठे, ता. वाई गावच्या हद्दीतून यातील तक्रारदारांच्या गोठ्यातून दोन मुर्‍हा जातीच्या म्हैशी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत किरण नानासो पोळ रा.कवठे, ता. वाई, जि. सातारा यांनी तक्रार दिल्याने भुईंज पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक रात्रीच्या वेळी शेतकन्यांच्या गोठ्यातून जनावरे चोरीस जाण्याचे प्रकार घडत असल्यामुळे व हा गुन्हा हा शेतकर्‍यांशी संबंधीत असल्यामुळे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या भुईज पोलीस ठाण्याचे प्रभारी पुथ्वीराज ताटे यांना सूचना दिल्या होत्या. 

त्याअनुषंगाने पृथ्वीराज ताटे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते. पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती घेतली असता हे आरोपी वाई येथून एका पिकअप मधुन पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचवड चौक येथे भुईंज पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विश्‍वासात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांनी कवठे येथील 2 म्हैशी, ओझर्डे येथील 1 म्हैस, खडकी येथील 1 जर्शी गाय, तसेच कुडाळ येथील 2 म्हैशी चोरी करुन त्या चाकण, जि.पुणे, काष्टी- श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, सांगोला जि. सोलापुर, येथील गुरांच्या बाजारामध्ये विक्री केल्याचे सांगितले. या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली असून त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बेंदुर सणादिवशी झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उ.नि. सुरेश शिंदे तसेच भुईंज पोलीस ठाण्याचे, पोहवा नितीन जाधव, पो.हवा. धायगुडे, पोकॉ. सोमनाथ बल्लाळ, पोकॉ. सागर मोहिते, पोकॉ किरण निंबाळकर यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिंदेवाडीत मध्यरात्री रक्तरंजित थरार; युवकावर जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाणीसह गोळीबार, चार संशयित आरोपींना अटक
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी माण तालुक्यातील एकास 15 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

संबंधित बातम्या