सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ केल्याप्रकरणी यमुना दांडे, कांता दांडे, सुधीर दांडे, अरुण दांडे (सर्व रा.नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना दि. 19 जुलै रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.