सातारा : यावेळी ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, मला ग्रामविकास पंचायत राज विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना बारमाही कसे पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करुन तालुके येत्या 5 वर्षात दुष्काळमुक्त करणार आहे. सोळशी धरणाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. हे धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून दुष्काळी तालुक्यांना बारमाही पाणी मिळेल असेही त्यांनी सांगितले.
श्री सेवागिरी देवस्थानच्या माध्यमातून दरवर्षी कृषी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबर अत्याधुनिक कृषी औजारांची माहिती होण्याबरोबर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. श्री सेवागिरी देवस्थाने ज्या ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला जाईल, असेही ग्राविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पुसेगाव यात्रेमध्ये प्रशासनाने पहिल्यादांच आरोग्यदायी यात्रा हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील प्रगतशिल शेतकऱ्यांना सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.