सातारा जिल्ह्यात पूर्व भागाला दुष्काळाच्या झळा; 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा, 16 विहिरी आणि 9 बोअरवेलचे अधिग्रहण

by Team Satara Today | published on : 08 October 2026


सातारा :   जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील  39 गावे आणि 236 वाड्यांमधील 54, 257 नागरिक आणि 41,107 पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये 1 शासकीय आणि 34 खाजगी टँकरचा समावेश तसेच पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने 16 विहिरी आणि 9 बोअरवेलचे अधिग्रहित केले आहे.
 माण तालुक्याला  31 गावे आणि 200 वाड्यांमधील 45,702 लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात 38,972 पशुधन देखील बाधित असून तेथे 1 शासकीय व 29 खाजगी अशा एकूण 30 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, तसेच 10 विहिरी आणि 6 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे.
खटाव तालुक्यातील 7 गावे आणि 36 वाड्यांमधील 7,833 नागरिकांना   4 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये 6 विहिरी आणि 3 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, का. खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे.
फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील 722 नागरिकांसाठी 1 खाजगी टँकर सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेर्‍या आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या रणांगणात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीत कुणाचा राहणार वरचष्मा? ठरावांच्या ताकदीवर महायुतीत जागांची बेरीज-वजाबाकी, रविवारी महायुतीची निर्णायक बैठक
पुढील बातमी
नवरात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्थेसाठी 'शांतता, शिस्त व सुरक्षितते'ची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन; सातारा तालुका पोलिसांकडून मंडळे व ग्रामप्रमुखांची बैठक

संबंधित बातम्या