सातारा : जनता सहकारी बँक लि., साताराचे सभासद अनिकेत सुनिल जाधव (रा. रामशास्त्री स्मारक मु. पो. क्षेत्र माहुली, सातारा) यांना वडूथ शाखेमार्फत 'हार्ले डेव्हिडसन एक्स ४४० ' या दुचाकी गाडीचे वितरण बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांच्या हस्ते, बँकेचे संचालक सदस्य, अधिकारी, सेवकांच्या उपस्थितीत करण्यांत आले.
यावेळी बोलताना चेअरमन अमोल मोहिते यांनी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या तसेच व्यवसाय वाढ करू इच्छिणाऱ्या तरुण व होतकरू व्यावसायिकांसाठी कॅश क्रेडीट कर्ज तारणी ९.५० टक्के, सामान्य कर्जतारणी १० टक्के या विशेष अल्प व्याजदराच्या कर्ज योजना त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहन, व्यवसायातील मशिनरी खरेदी, घर बांधणी व खरेदी करिता देखील विविध सुलभ व्याजदराच्या कर्ज योजना सुरु असून त्याचा जास्तीत जास्त सभासद, उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
अनिकेत सुनिल जाधव यांनी बँकेकडून वाहन कर्ज त्वरित वितरीत केल्याबद्दल सर्व संचालक सदस्य, अधिकारी व सेवक वर्ग यांना सहकार्याबद्दल धन्यवाद देवून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमास बँकेचे व्हा. चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, माधव सारडा, चंद्रशेखर घोडके, मच्छिंद्र जगदाळे, अविनाश बाचल, ॲड. चंद्रकांत बेबले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य विनय नागर, सेवक संचालक नीळकंठ सुर्ले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, महेंद्र पुराणिक, संजय काटकर, सौ. सरीता कुंजीर, अभिजित साळुंखे, बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.