एकाच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अंगापूर वंदन, ता. सातारा हद्दीतील दरे नावाचे शिवारात असलेल्या शेतात सचिन विलास पाटोळे रा. ब्रह्मपुरी, पोस्ट रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा चालवीत असलेल्या ट्रॅक्टर क्र. एमएच 11 यु 1396 याने हा ट्रॅक्टर बेदरकारपणे चालवून ट्रॅक्टर पलटी करून अपघात केला. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेला नवनाथ दीपक कणसे रा. अंगापूर वंदन, ता. सातारा याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे करीत आहेत.


मागील बातमी
नवीन एमआयडीसीत सुमारे 27 हजारांची घरफोडी
पुढील बातमी
साडेपाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी वकिलासह दोन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या