पाटण : सध्या पावसाळा चांगली सुरुवात झाली असल्याने पाटण तालुक्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, या याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय एका पतिपत्नीला आला आहे. येथील सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला गेलेल्या एका पतीला तिच्या पत्नीसमोरच 6 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्या 6 तरुणांनी पत्नीकडे पाहून आरडाओरडा केल्यामुळे त्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील सडावाघापूर पठारावर सातारा तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी दुचाकीने धबधबा पहायला गेले होते. त्या ठिकाणी गेल्यावर पवनचक्कीजवळ उभे राहून दोघांनी मोबाईलमधून काही सेल्फी फोटोही काढले. त्यांच्याप्रमाणे धबधब्याच्या ठिकाणी इतर 5 ते 6 तरुणही फिरण्यासाठी आले होते. त्यांनी पत्नीकडे पाहून आरडा-ओरडा केला. त्यांच्या आरडाओरडा करण्यामुळे पतीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारला असता त्या तरुणांनी पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
आपल्या पतीला मारताना पाहिल्यानंतर पत्नीने त्या तरुणांना पतीला सोडा अशी विनवणी केली आणि पतीला तरुणांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ती पुढे गेली असता त्या तरुणांनी तिला धक्काबुक्की करत बाजूला ढकलले. तरुण पतीला मारल्यानंतर त्या ठिकाणाहून पसार झाले. मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीने पतीला घेऊन थेट मल्हारपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने फिर्याद दाखल केल्यानंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार आनंद आव्हाड करत आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |