08:49pm | Jan 19, 2025 |
सातारा : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम भोसले यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भाजपा सदस्यता अभियान सुरू आहे.
याच अनुषंगाने सातारा शहरातील मोती चौक येथे भारतीय जनता पार्टी सातारा शहर कार्यकारिणी आणि उद्योग आघाडी कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने, सातारा शहरातील नागरिकांना या अभियानाची माहिती व्हावी यासाठी भाजपा सदस्यता अभियान घेण्यात आले.
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष झालेला आहे. प्रत्येक पाच ते सहा वर्षांनी सदस्यांची पुन्हा नोंदणी करण्याची योजना भारतीय जनता पार्टी करत असते. यामुळे जुन्या सदस्यांच्या बरोबरच नवीन नागरिकांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जातात, त्यांच्याशी संपर्क करतात आणि भाजपाचे सदस्य म्हणून त्यांची नोंदणी करून घेतात. याचबरोबर चौका-चौकात कार्यकर्ते उभे राहून, नागरिकांना आवाहन करून सदस्य करून घेत असतात.
या सदस्य नोंदणी बरोबरच भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ते, सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा करत असते. या सक्रिय सदस्यांच्या मधूनच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत असतात.
महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दीड कोटी सदस्य करण्याचे आव्हान स्वीकारले असून यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये किती नोंदणी करायची हे ठरवून दिलेले आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये काम चालू आहे.
सातारा शहरात सुद्धा प्रत्येक बुथवर नोंदणी अभियान सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना सदस्य होण्याचे आवाहन करत आहेत.
मोती चौकात झालेल्या या कार्यक्रमाला नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परिषद आमदार आणि मन की बात अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी भेट दिली. कार्यकर्ते करत असलेल्या कामाचे, उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि नागरिकांना भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्याचे आवाहन केले.
यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, उद्योग आघाडी प्रदेश सरचिटणीस अमोल सणस, उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सायली मुतालिक, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, प्रवीण शहाणे, नितीन कदम, विक्रांत भोसले, धनंजय पाटील, विक्रम बोराटे, विजय नायक माजी नगरसेवक किशोर पंडित, प्रशांत जोशी, मनीष महाडवाले, सचिन साळुंखे, अमोल टंकसाळे, नगरसेवक विजय काटवटे, ऍड सचिन तिरोडकर, सूर्यकांत पानसकर, अमित काळे, राहुल चौगुले, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, शहराध्यक्ष रीना भणगे, गौरी गुरव, डॉ. नीता यादव, अश्विनी हुबळीकर, सुचरिता कंडारकर, श्रद्धा घोडके, डॉ. सुवर्णा फडतरे, जयश्री पाटुकले, नजमा बागवान, चित्रा माने, अग्रजा गुरव, नानासाहेब जगताप, दत्तात्रय भंडारी, सतीश करचे, डॉ. निकम, प्रशांत जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सातारचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असलेल्या भगवानराव शेवडे यांनी आनंदाने भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. लातूर वरून आलेल्या भाजपा महिला मोर्चा सचिव सौ. पाटील यांनी सुद्धा कार्यक्रम स्थळी भेट दिली. भाजपच्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुद्धा कार्यक्रम स्थळी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |
शासकीय, खाजगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी |
महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार साहित्य पुरस्कार |
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |
शासकीय, खाजगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी |
महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार साहित्य पुरस्कार |
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |