गोवा : गोवा सरकार ७५ ठिकाणी मोफत सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट आणत आहे. त्याचबरोबर नेटवर्क कव्हरेज वाढविण्यासाठी ११ नवीन 4G मोबाइल टॉवर बसवत आहे. डिजिटल पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रहिवाशांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी हा उपक्रम गोवा सरकारने सुरू केला आहे. हाय-स्पीड इंटरनेट सुलभता आणि प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनास चालना देण्यासाठी रिमोट वर्कर्स व फ्रीलान्सरसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून गोवा विकसित करण्याचे धोरण सरकारचे आहे.
गोव्याच्या पर्यटन दृष्टीकोणात बदल घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 'लेट्स गोवा'चा शुभारंभ केला आहे. हे एक अभिनव असे डिजिटल माध्यम आहे, जे स्थानिक आणि पर्यटकांना अखंड प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
लेट्स गोवा गोव्याचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी एक साधन म्हणूनही काम करेल. गोव्याचे अस्सल आकर्षण जपून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊन, पर्यटक ऐतिहासिक खुणा शोधू शकतात, महोत्सवांना उपस्थित राहू शकतात आणि गोव्यातील खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस डिझाईन, सुलभ पेमेंट आणि अविस्मरणीय अनुभव प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करून, लेट्स गोवा हे प्रत्येक प्रवाशासाठी गोव्याच्या पर्यटन आत्म्याचे प्रवेशद्वार बनण्यास सज्ज आहे.
लेट्स गोवा, हे पर्यटन अनुभवाचे माध्यम (टीईपी) पर्यटक, स्थानिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी एक परिवर्तनकारी मंच आहे, ज्यात हॉटेल व्यवसायिक, वाहतूक एजन्सी, सेवा प्रदाते आणि टूर ऑपरेटर यांचा समावेश आहे. हे व्यवसायांना त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यास अनुमती देते तसेच पर्यटकांना ते सहजपणे शोधण्यास आणि बुक करण्यास सक्षम करते.
या शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की “गोवा हे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि लेट्स गोवाचे लाँच हे अखंड, तंत्रज्ञान-आधारित सेवा प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे व्यासपीठ गोव्याचा समृद्ध वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रदर्शन करण्यास मदत करेल तसेच पर्यटक आणि स्थानिकांसाठी समान सुविधा सुनिश्चित करेल.
पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे म्हणाले, की “लेट्स गोवा हे पर्यटन अनुभव व्यासपीठ गोव्यातील सेवा, पर्यटन, तंत्रज्ञान आणि स्थानिक व्यवसायांना एकत्रित करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करते. लेट्स गोवासह पर्यटकांच्या गोव्यातील प्रवासावेळी सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वसनीय, एकल-पॉइंट संसाधनासह सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे स्थानिक व्यवसायांना व्यापक प्रेक्षकांशी जोडल्यामुळे त्यांचा फायदा होईल.”
लेट्स गोवा हे पर्यटकांसाठी एकाच ठिकाणी तोडगा प्रदान करते ज्यात निवास, साहसी क्रियाकलाप, सांस्कृतिक अनुभव आणि अधिकसाठी बुकिंग प्रदान करते. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये पॅराग्लायडिंग, जंगल सफारी आणि कयाकिंग यांसारख्या क्रियाकलापांसाठी सुरक्षित ऑनलाइन बुकिंग समाविष्ट आहे, तसेच डिजिटल पर्यटन कार्ड (ई-कार्ड) जे पर्यटकांना अनन्य सवलती, बक्षिसे आणि रिडीम करण्यायोग्य वाहतूक पॉइंट्स अनलॉक करते. हे माध्यम इव्हेंट, अन्य आकर्षणे आणि महोत्सवांबद्दल अध्ययावत माहिती देखील प्रदान करते.
सुनील अंचिपाका, आयएएस, पर्यटन खात्याचे संचालक यांनी सांगितले, की लेट्स गोवा यात १०० हून अधिक हॉटेल्स, ५० हून अधिक क्रियाकलाप प्रदाते आणि जीटीडीसी निवासस्थानांसह, माध्यम बुकिंग सुलभ करते आणि गोव्याचा समृद्ध वारसा, वेलनेस, साहस आणि अंतर्गत पर्यटनाला देखील प्रोत्साहन देते.
या समारंभात अखंड डिजिटल जोडणीसाठी ७५ मोफत सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स, मोबाइल नेटवर्क कव्हरेज वाढवण्यासाठी ११ ४जी बीएसएनएल टॉवर आणि कार्यक्षम नियोजन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वन मॅप गोवा जीआयएस पोर्टलचा देखील शुभारंभ झाला.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |