सातारा : मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील प्रतापगंज पेठेत घराबाहेर चप्पल ठेवण्यावरुन वाद होवून लज्जास्पद बोलल्याप्रकरणी तसेच गळ्यातील 18 ग्रॅम सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतल्याप्रकरणी गणेश अरुण माने (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्यावर तसेच महिलेला लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यासह पत्नीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 27 रोजी घडला. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.
तसेच दुसर्या तक्रारीत नमूद केले आहे की, गणेश पोतदार, त्याची पत्नी, मुले चेतन, केतन, कु. शौर्या (रा. प्रतापजंग पेठ) यांनी फिर्यादी महिलेस व पतीला लोखंडी हत्याराने मारहाण केली. तुम्हाला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच फिर्याद महिलेस अश्लिल शिवीगाळ केली. पोलीस हवालदार बोडरे तपास करत आहेत.