सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी दुपारी अडीच ते पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान गांधी क्रीडा मंडळ, यादोगोपाळ पेठ, सातारा येथे तेथीलच कनिष्क सचिन जांगळे या युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आर्यन रमेश कांबळे, आर्यन राहुल कांबळे, सुरज दिलीप उंबरकर, भूषण सचिन बाबर, शौर्य कैलास परदेशी आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.