कृष्णा, कुडाळी व वसना नद्यांमधून पाणी उपसा करण्यास बंदी आदेश जारी - कार्यकारी अभियंता सं. रा. सातपुते

by Team Satara Today | published on : 18 June 2026


सातारा :  धोम व धोम बलकवडी धरणातील व मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ११, ४९ मधील तरतुदीनुसार १६ जून २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या व बिगरसिचन औद्योगिक कारणास्तव सर्व योजनांवर उपसा बंदी आदेश जारी करण्यात येत आहेत. पिण्याचे पाणी पुरवठा योजना सुरू राहतील.

उपसा बंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणांसाठी (खाजगी व औद्योगिक) कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून संबंधिताचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा १ वर्षाच्या कालावधी करिता रदद बातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.

धरणांतील व प्रकल्पातील मर्यादित पाणी साठयाचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकत्यांनी सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणी साठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबंधितांनी याची दक्षता घेवून पाणी नाश टाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सं. रा. सातपुते यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सांगली-सातारा मतदारसंघात ९९.८९ टक्के विक्रमी मतदान; महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला, ११ केंद्रांवर १००% मतदानाची नोंद
पुढील बातमी
काढणी पश्चात पायाभूत सुविधा, गोदाम, मिनि ऑईल बांधकामासाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

संबंधित बातम्या