सातारा : प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्लाझामा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापर करण्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंध आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सातारा जिल्हयामध्ये 12 ते 18 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीसाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत / कार्यक्रमात, कोणत्याही व्यक्ती किंवा गणेश मंडळ किंवा कार्यक्रम आयोजक यांनी प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरात / उपयोगात आणू नयेत. यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे वापरास प्रतिबंध करण्यात येत आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरास प्रतिबंध
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
by Team Satara Today | published on : 13 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा