शेतातील बांधाच्या कारणावरून कारंडवाडी येथे मारामारी; सातारा तालुका पोलीस ठाण्यातपरस्परविरोधी तक्रारी दाखल

by Team Satara Today | published on : 28 November 2026


सातारा : मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील बांधाच्या कारणावरून हिम्मत लक्ष्मण साळुंखे (रा. कारंडवाडी, ता. सातारा) तसेच त्यांच्या आई वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी प्रवीण पांडुरंग साळुंखे, संग्राम पांडुरंग साळुंखे, तुकाराम सिद्धू साळुंखे, विठ्ठल सिद्धू साळुंखे, प्रज्योत जयवंत गोरे (सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
दरम्यान प्रवीण पांडुरंग साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार, हिम्मत लक्ष्मण साळुंखे, लक्ष्मण महादेव साळुंखे, छाया लक्ष्मण साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फॉरेस्ट कॉलनी परिसरात चेन स्नॅचिंग; अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
मुख्यमंत्री यांच्या वॉटर कप घोषणेनंतर सातारा जिल्ह्याची तात्काळ कृती! राज्यात सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात पाणलोट व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

संबंधित बातम्या