अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील किरकसाल, निढळ व मांडवे या ग्रामपंचायतींना 1 कोटी ३० लाखांचा पुरस्कार

by Team Satara Today | published on : 13 September 2024


सातारा :  'लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन' साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा, जळगाव, पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये किरकसाल, निढळ व मांडवे ग्रापंचायतीने पुरस्कार पटकविले आहेत. 

या पुरस्काराचे वितरण  पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)   दादाजी भुसे, खासदार भास्करराव भगरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्नन झाले.

सातारा जिल्ह्यतील जिल्हास्तरावर किरकसाल ता.माण प्रथम पुरस्कार तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावून ८० लाख रु.बक्षीसाचा  पुरस्कार  मिळविला. तसेच जिल्हास्तरावर   द्वितीय क्रमांक निढळ ता. खटाव ३० लाख रु. व तृतीय क्रमांक मांडवे ता. खटाव २० लाख रु. पुरस्कारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायतींना १ कोटी ३० लाखांच्या पुरस्काराच्या रकमेचे वाटप करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला पाटण तालुक्यातील लाडक्या बहिणींशी संवाद

संबंधित बातम्या