कोयना धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर; 0.26 टीएमसी पाण्याची गरज

by Team Satara Today | published on : 23 August 2026


सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत आहे, गेल्या 24 तासात कोयनानगरला 21 व नवजा येथे 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून 99.74 टीएमसी झाला आहे. धरणातील पाणीसाठा 100 टीएमसी होण्यासाठी अजूनही 0.26 टीएमसी पाण्याची गरज आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढत आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 4 हजार 938 क्यूसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 0.42 टीएमसीने वाढला आहे.

सत्य धरणात 99.74 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 100 टीएमसी भरण्यासाठी अजूनही 0.26 टीएमसी पाण्याची गरज आहे, आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण 100 टीएमसी पाणी पातळी गाठेल असा अंदाज धरण व्यवस्थापनाने वर्तविला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बावधन येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील नेहा पिसाळ यांच्या संघर्षाला यशाची पावती; राज्य कर निरीक्षक पदावर निवड

संबंधित बातम्या