सातारा : सातारा जिल्ह्याच्या आठ विधानसभा मतदारसंघाची प्रांत कार्यालयांमधून बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये 198 उमेदवारांचे अर्ज वैध झाल्याचे कळविण्यात आले आहे तर 81 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 215 उमेदवारांचे 219 अर्ज दाखल झाले होते बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली या छाननी प्रक्रियेमध्ये 81 अर्ज बाद झाले आहेत फलटण येथून 26, वाई येथून 28 ,कोरेगाव येथून 2%, माणंमधून 33 ,कराड उत्तर मधून 2%, कराड दक्षिणमधून 20, पाटण मधून 18 सातार्यातून 19 अर्ज असे एकूण 198 अर्ज वैध झाल्याची माहिती कार्यालयाने कळविले आहे .81 अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाल्याचे सांगण्यात आले अर्ज माघारी घेण्याची मुदत चार नोव्हेंबर आहे त्यानंतर आठ विधानसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सदरबझार येथील विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
November 05, 2025
नोकरीच्या अमिषाने फसवणूकप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा
November 05, 2025