साताऱ्यात रविवार पेठेत महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात; अंधश्रद्धेला बळी न पडण्याचा महिलांचा निर्धार

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : रविवार पेठ येथील सर्वोदय हाऊसिंग सोसायटीत आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त झालेल्या विशेष सोहळ्यात प्रभागातील महिलांनी 'अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी न पडण्याचा' सामूहिक संकल्प केला.

प्रभागातील महिलांनी एकत्र येत सामाजिक स्वच्छतेचा आणि वैचारिक परिवर्तनाचा निर्णय घेतला. कुठल्याही प्रकारच्या भोंदूगिरीला किंवा अंधश्रद्धेला थारा देणार नाही, असा निश्चय यावेळी सर्व महिलांनी केला. याप्रसंगी समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी आपले विचार मांडले. 

यामध्ये प्रमोद काळे, धनश्री सावंत, प्रिस्टाईन स्कूल पुणेच्या प्राचार्य स्वाती काळे, अ‍ॅड. स्नेहल रणपिसे आणि स्मिता सावंत यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला. प्रामुख्याने प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाषणे करत महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित केली.

 माजी नगरसेवक बाबा शिंगरे, पालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती अ‍ॅड. मोनिका घोरपडे, नूतन नगरसेवक सचिन पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार, हेमंत रणपिसे, सागर सावंत, राजू भोसले, बाळासाहेब सावंत, अजित सावंत, प्रदीप भोसले, श्रीमती खाडे, श्रीमती मालन रणपिसे, लता सावंत, रंजना सावंत, संध्या धस्के, लक्ष्मी मोरे, अ‍ॅड. स्नेहल रणपिसे, धनश्री सावंत तसेच सर्वोदय हाऊसिंग सोसायटीमधील नागरिक आणि प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथे दि. १८ रोजी दलित महासंघातर्फे प्रबोधन मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन; संस्थापक उमेश चव्हाण यांची माहिती
पुढील बातमी
पुस्तकाचे गाव ‘भिलार’ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात ; ग्रामपंचायतीत प्रतिमेचे पूजन

संबंधित बातम्या