समाज कल्याण विभागामार्फत एक कोटी आठरा लाखाची शिष्यवृती मजुंर

by Team Satara Today | published on : 17 April 2025


सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृतती योजना राबविल्या जातात.जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषद सातारा यांचे मार्फत सन २०२४-२५ या वर्षामध्ये खालील नमुद योजनांमधील एकुण पात्र १२५२२ विद्यार्थ्यांना १,१८,७७,५०० इतकी शिष्यवृत्ती मजुंर करण्यात आली असुन डीबीटीव्दारे विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

मुलींसाठी राबविल्या जाणाऱ्या इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागास प्रवर्गातील मुलीकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती २२६ लाभार्थी ४,५२,००० रुपये खर्च,अनुसुचित जातीतील विद्यार्थिनीनां सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ,३००० लाभार्थी ३०,००,००० रुपये. इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलीकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवत्ती १४६६ लाभार्थी ३६,६५,०००, इ.५ वी मध्ये शिकणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती १६६६ लाभार्थी ९,९९,६००/ रुपये तसेच इयत्ता इ.५ वीते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींकरिता सावत्रिबाई फुले शिष्वृत्ती लाभार्थी ९३९ रक्कम ५,६३४०० रुपये. इयत्ता १० वी मध्ये  शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्याथ्यांना शिक्षण शुल्क व परक्षिा शुल्क देणे एकुण लाभार्थी १९०२ रक्कम वितरीत ७,१६,०००, इ.१ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती लाभार्थी १०६६ एकुण वितरीत रक्कम ११,८०,५०० रुपये.माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना ९,२६,००० तसेच विजाभज विमाप्र प्रवर्गातीलगुणवत्ता शिष्यवृत्ती लाभार्थी ११४० वितरीत रक्कम ३,७५,००० रुपये वितरीत करण्यात आले आहेत.असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सातारा यांनी कळविले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तासवडेत प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा छापा
पुढील बातमी
बिबट्याचा दुचाकीवरील मुलीवर हल्ला

संबंधित बातम्या