जुगार अड्डयांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 26 October 2024


सातारा : सातारा शहरसह तालुक्यातील जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून तीनजणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार पेठेतील खंडोबा मंदिराच्या आडोशाला महम्मद वजीर खान (वय 69, रा. रविवार पेठ, सातारा) हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर दि. 21 रोजी सायंकाळी 6.54 च्या सुमारास पोलीस हवालदार मोहिते यांनी कारवाई केली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लिंब (मानेवस्ती), ता. सातारा येथे जुगार खेळणार्‍या जयदीप पोपटराव यादव (वय 42, रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर दि. 21 रोजी दुपारी 12.30 वाजता पोलीस हवालदार संजना गायकवाड यांनी कारवाई केली.

/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

नागेवाडी, ता. सातारा येथे दि. 21 रोजी विनोद जगन्नाथ सावंत (वय 48, रा. नागेवाडी) पोलीस कॉन्र्स्ंटेबल शिवाजी डफळे यांनी कारवाई केली. दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड जप्त
पुढील बातमी
अवैध दारु प्रकरणी तिघांवर कारवाई

संबंधित बातम्या