सातारा : सातार्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनामती चौकात शुक्रवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी होत राडा झाला. वाहने व दुकानाची तोडफोड करत हल्लेखोरांनी दहशत माजवली. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हीलमध्ये उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. युवकांच्या दोन गटात वाद सुरु आहे. अधूनमधून ही धुसफूस सुरु असताना शुक्रवारी त्याला निमित्त मिळाले. एकमेकांकडे खून्नशीने बघितल्याच्या कारणातून वादावादीला सुरुवात झाली. तोपर्यंत दोन्ही गटातील युवक एकमेकांसमोर आले. हत्यारे काढत संशयितांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन युवकांना गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.