सातारा तालुका हद्दीतून २७ जण हद्दपार; १६०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम

by Team Satara Today | published on : 23 September 2026


सातारा : गणेशोत्सव तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या २७ सराईत गुन्हेगारांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले असून, तब्बल १ हजार ६०० संशयित व उपद्रवी इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, खंडणी, चोरी यांसह शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या २७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार तसेच प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या २७ जणांना गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन दिवसांसाठी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
सणांच्या काळात संवेदनशील ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत, तसेच सराईत गुन्हेगारांकडून कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये १ हजार ६०० संशयित व उपद्रवी इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत असून, कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कारवाईचा आकडा
२७ सराईत गुन्हेगार हद्दपार
१,६०० संशयित व उपद्रवी इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई
२ दिवस हद्दपारीचा कालावधी
मारामारी, खंडणी, चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांवर कारवाई


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रलंबित कामांवरून सातारा पंचायत समितीचे अधिकारी धारेवर; विविध विभागांच्या आढावा तयारीवर सविस्तर चर्चा
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

संबंधित बातम्या