शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी समीर कच्छीवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 06 September 2024


सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी समीर कच्छीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी प्रभाकर हिरामण साळुंखे राहणार प्रतापगंजपेठ सातारा हे त्यांच्या राहत्या घरी असताना समीर सलीम कच्छी राहणार मोळाचा ओढा, सातारा हा दारू पिऊन साळुंखे यांच्या घरात आला. तसेच त्याने साळुंखे यांच्या पत्नीसह प्रभाकर साळुंखे यांना शिवीगाळ, दमदाटी केली आहे. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस हवालदार माने अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू

संबंधित बातम्या