सातारा : येथील राजवाडा परिसरातील श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या समर्थ सदन, संत ज्ञानपीठ सांस्कृतीक केंद्र येथे प्रतिवर्षाप्रमाणे दासनवमी उत्सवानिमित्त सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत श्रीमत दासबोध ग्रंथाचे सामुदायिक वाचन पारायण स्वरूपात संपन्न होणार आहे. या दासबोध पारायणासाठी समर्थ भक्त बाळूबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथाचे वाचन होणार आहे. समर्थ सदन येथे 22 फेब्रुवारीला 109 उत्सवाची सांगता होणार आहे.
तसेच दि. 13 फेब्रुवारी पासून सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन व प्रवचन सेवा संपन्न होणार आहे. दि. 13 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील डाॅ.विजय लाड यांचे प्रवचन होणार आहे.दि. 14 व 15 फेब्रुवारी रोजी सांगली येथील संजय कोटणीस महाराज यांचे प्रवचन होणार आहे. दि. 16 व 17 फेब्रुवारी रोजी सातारा येथील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार विद्यागौरी ठुसे यांचे कीर्तन होणार आहे. दि. 18 फेब्रुवारी रोजी सौ.रमा कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन व भक्ती गीताचा कार्यक्रम होणार आहे. दि. 19 व 20 फेब्रुवारी रोजी नंदकुमार देशपांडे, कोरेगाव यांचे प्रवचन होणार आहे. या कार्यक्रमाची सांगता 21 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार व आकाशवाणी निवेदिका कु.दीपा भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण यांची असून तबला साथ विश्वनाथ पुरोहित करणार आहेत. दि.22 फेब्रुवारी रोजी दास नवमी निमित्त दासबोध ग्रंथ वाचन पारायण सोहळ्याची सांगता होणार असून दुपारी प्रसादाचे वितरण होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य असून या सर्व कार्यक्रमांना समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस कार्याध्यक्ष डाॅ.अच्युत गोडबोले व कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.