सातारा : खंडाळा, तालुका खंडाळा येथे असणाऱ्या एका लॉजवर कुंटणखाना चालवणाऱ्या सात जणांवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून सहा पीडितांची सुटका केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या कुंटणखाण्यांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने देवकर यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांना माहिती प्राप्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि. 13 रोजी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, खंडाळा गावच्या हद्दीत सातारा-पुणे आशियाई महामार्गावर असणाऱ्या मोनिका लॉजचे चालक मालक यांनी वेश्या गमनासाठी मुली ठेवलेल्या आहेत व ते मागणी केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवतात. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक तसेच खंडाळा पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांनी व त्यांच्या पथकाने मोनिका लॉज वर छापा टाकून वेश्या व्यवसायास प्रेरणा देणाऱ्या राहुल वसंता शृंगारे रा. शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा, रावेर शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरीश वासुदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले, रंजनकुमार लक्ष्मण मलिक सर्व रा. मोनाली लॉज, पारगाव खंडाळा यांना ताब्यात घेतले व सहा पीडित महिलांची सुटका करून संबंधितांविरोधात खंडाळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, एस. एस. शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विक्रम पिसाळ, रविराज वर्णेकर, मोना निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, तृप्ती शिंदे, शहनाज शेख, खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिघे, चव्हाण, नेवसे यांनी सहभाग घेतला.
खंडाळ्यातील लॉजवर कुंटणखाना चालवणाऱ्या सात जणांवर गुन्हा
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सहा पीडितांची सुटका
by Team Satara Today | published on : 15 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा