नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

by Team Satara Today | published on : 11 September 2025


मुंबई : नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेमुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना आता त्यांना परत आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पर्यटकांना आवश्यक मदत पुरवली जात आहे. राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. याशिवाय, बीड जिल्ह्यातील काही पर्यटक खाजगी वाहनाने रस्तेमार्गे परत येत असून ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले आहेत.

सध्या नेपाळमध्ये आहेत त्या लोकांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यक बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या व भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही मदतीसाठी दूतावासाचे हेल्पलाईन क्रमांक +९७७-९८० ८६० २८८१ (व्हॉट्सअॅप कॉल) +९७७-९८१ ०३२६१३४ (व्हॉट्सअॅप कॉल) यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळच्या काठमांडूमधील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून नेपाळच्या संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. नेपाळमध्ये पसरलेल्या हिंसाचाराचा सामना एका भारतीय पर्यटकालाही करावा लागला आहे.

काठमांडूमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. मंगळवारी सकाळपासून संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने निदर्शक पंतप्रधानांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आहेत. वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
थकीत कर्ज एकरक्कमी भरणा करणाऱ्यांना मिळणार 50 टक्के सवलत
पुढील बातमी
राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला मिळणार झळाळी

संबंधित बातम्या