माजगावकर माळ शाहूपुरी येथे घरफोडी; ६७,४०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास

by Team Satara Today | published on : 03 February 2026


सातारा : आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या माजगावकर माळ येथून दि ३० रोजी बंद असलेल्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूचा सिमेंटचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने फोडून घरामध्ये प्रवेश केला. यामध्ये ४७ हजार ४०० रुपययांचे सोने-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम असे एकूण  ६७,४०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद संगीता अनिल पवार (वय ४५, रा. आकाशवाणी केंद्राजवळ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुका पोलिसांनी देगाव गावच्या हद्दीत दारूच्या बाटल्या केल्या जप्त
पुढील बातमी
काशीळ येथे महामार्ग ओलांडताना कारची बापलेकाला धडक; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू; ३१ जानेवारी रोजी झाला होता अपघात

संबंधित बातम्या