लिंबाचीवाडी-नांदगाव मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण; तिघांविरुद्ध बोरगाव पोलिसांत गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा :  लिंबाचीवाडी-नांदगाव मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर पत्र्याचे शेड उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आनंदा हनुमंत शिंदे यांच्या तक्रारीनुसार, वळसे कॅनॉल रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमुळे शेतकरी व व्यावसायिकांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधितांना अतिक्रमण हटविण्याची विनंती करूनही त्यांनी नकार देत दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी विजय दिनकर पिसाळ, शशिकांत दिनकर पिसाळ आणि अरविंद सोपान पिसाळ (सर्व रा. लिंबाचीवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागठाणे येथे दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर बोरगाव पोलिसांचा छापा; तिघांवर कारवाई
पुढील बातमी
मल्हारपेठ पोलीस ठाण्यासमोर गोंधळ; विहे येथील मद्यधुंद व्यक्तीवर गुन्हा

संबंधित बातम्या