रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

जिल्ह्यातील साडेचारशे कोटींच्या देयकासाठी पाठपुरावा करणार

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : महाराष्ट्रातील तब्बल 12 हजार ठेकेदारांचे 49 हजार कोटी रुपये थकीत आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल साडेचारशे कोटी रुपये ठेकेदारांना देणे बाकी आहे. ठेकेदार संघटनेच्या या मागण्यांना बळ देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

याबाबत जिल्हा प्रशासनाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात नमूद आहे की, एखाद्या कामाची एकदा नव्हे तर चार वेळा तपासणी करून त्या कामाचे बिल अदा करणे हे काम ठेकेदारांनी केलेले आहे. तरीसुद्धा ही बिले अद्याप मिळालेली नाहीत. ठेकेदार सर्व केलेल्या कामाचे बिल मागत आहेत. महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशन प्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग नगर विकास विभाग तसेच विविध विभागांची 49 हजार कोटीची बिले थकीत आहेत. सातारा जिल्ह्यात राज्य ठेकेदार संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा थकीत देयकांच्या संदर्भाने पाठपुरावा करण्याचे नियोजन ठरवण्यात आले होते.

सांगलीमध्ये हर्षल पाटील या ठेकेदाराने एक कोटी रुपयांचे बिल थकीत राहिले म्हणून आत्महत्या केली. असे प्रकार पुढे होऊ नयेत तसेच ठेकेदारांच्या बिलांसाठी शासन पातळीवर पाठपुरावा हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ध्येय आहे. सातारा जिल्ह्यातील साडेचारशे कोटीच्या देयकांबाबत अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासन व वरिष्ठ पातळीवर राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती रमेश उबाळे यांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचा जिल्हा प्रशासनाला विसर
पुढील बातमी
आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे काय...?

संबंधित बातम्या