सातारा : अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवी कोणी दिली, असे म्हणत युवकांच्या एका टोळक्याने मारहाण केली. करण, गणेश, विश्वनाथ व अनोळखी युवकाविरुध्द अल्पवयीन मुलाने तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 नोव्हेबर रोजी घडली आहे. वर्ये येथील हॉटेलबाहेर लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.