फलटण येथे कुंटणखाना चालवणारा पोलिसांच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची ऑरेंज लॉजिंग वर कारवाई

by Team Satara Today | published on : 23 July 2025


सातारा : फलटण येथील ऑरेंज लॉजवर बेकायदेशीर चालणार्‍या कुंटण खाण्याच्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत लॉज मालकाला अटक केली आहे. 

प्रवीण रंगराव पवार राहणार विडणी तालुका फलटण असे संबंधित इसमाचे नाव आहे. या कारवाई मध्ये तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. या इसमाच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत जाधववाडी तालुका फलटण गावच्या हद्दीत ऑरेंज लॉज येथे संशयित पवार याने वेश्यागमना करता मुली ठेवल्या आहेत, तो मागणीप्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवतो, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, नितीन माने, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, विजयमाला गाजरे, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव यांच्या पथकाने ऑरेंज लॉज येथे छापा मारून पवार यांना तात्काळ ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये तीन पीडित महिलांची तात्काळ सुटका करण्यात आली. संबंधित इसमाच्या विरोधात मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम चार व पाच नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, रविराज वर्णेकर, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, क्रांती निकम, फलटण पोलीस ठाण्याच्या राणी फाळके, अवघडे यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुद्रांक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
पुढील बातमी
गोडोली परिसरातून टेम्पोची चोरी

संबंधित बातम्या