01:01pm | Aug 31, 2024 |
नवी दिल्ली : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विलमोर 5 जून रोजी अंतराळ स्थानकात गेले होते. त्यांना घेऊन गेले अंतरळायान स्टारलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे दोन्ही अंतराळवीरांचा अंतराळ स्थानकातील प्रवास लांबला आहे. नासाने स्टारलाइनरमधून त्या अंतराळवीरांना परत आणण्यास नकार दिला आहे. परंतु स्टारलाइनर अंतराळ यान पृथ्वीवर परतणार आहे. येत्या 6 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 3.15 वाजता स्टारलाइन स्पेस स्टेशनपासून वेगळा होणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 दहा वाजता पृथ्वीवर परतणार आहे. स्टारनाइनरचे लँडिंग न्यू मेक्सिकोमधील व्हाइट सँड्स स्पेस हार्बरमध्ये होणार आहे.
5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर अंतराळात गेले होते. ते आठ दिवसांत पृथ्वीवर परतणार होते. परंतु स्टारलाइनरमध्ये बिघाड झाला. त्यातीन बिघाड दूर करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. या दोघं अंतराळविरांना स्पेसएक्सच्या ड्रॅगन या यानातून पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. त्यामुळे त्यांना अजून फेब्रुवारी 2025 पर्यंत त्या ठिकाणी थांबावे लागणार आहे. स्टारलाइनर पृथ्वीवर उतरण्याचे लाईव्ह प्रसारण नासा करणार आहे.
यापूर्वी दोन यानाचा अपघात :
नासाच्या वैज्ञानिकांना यापूर्वी झालेल्या दोन अपघातांमुळे भीती वाटत आहे. त्यामुळे स्टारलाइनरमधून दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची जोखीम घेतली जात नाही. हे यान रिकामे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी चॅलेंजर आणि कोलंबिया स्पेस शटल यानाचा अपघात झाला होता. या अपघातांमुळे स्टारलाइनर रिकामे उतरवण्याचा निर्णय घेतला. कोलंबिया स्पेस शटलचा अपघात 1 फेब्रुवारी 2003 रोजी झाला. चॅलेंजर अपघात जानेवारी 1986 मध्ये झाला होता. दोन्ही अपघातांमध्ये नासाचे एकूण 14 अंतराळवीर ठार झाले. ज्यामध्ये भारतीय वंशाची कल्पना चावला देखील होती.
स्टारलाइनर अंतराळ यान सुरुवातीपासून शेवटपर्यंत समस्यांनी वेढलेले होते. बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटी कंपनीने अंतराळवीरांना अंतराळ स्थानकापर्यंत नेण्यासाठी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टची निर्मिती केली आहे. नासाने 2011 मध्ये बोईंग स्पेसक्रॉप्ट बनवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. हे बनवण्यासाठी सहा वर्षे लागली. 2017 मध्ये यान पूर्ण झाले अन् 2019 मध्ये पहिले उड्डान झाले. ते उड्डान मानवरहित होते.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |