गावपातळीवर पोलीस पाटीलांची भुमिका फार महत्वाची - पोलीस अधीक्षक तुषार दोशी; जिल्ह्यातील पोलीस पाटलांना कार्यशाळेत मार्गदर्शन

by Team Satara Today | published on : 19 March 2026


सातारा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने गावपातळीवर पोलीस पाटीलांची भुमिका फार महत्वाची असते. गावातील विविध घटना, आपत्ती, सामाजिक प्रश्नाबाबतची माहिती पोलीस पाटील यांचेकडून तात्काळ मिळत असते. पोलीस पाटलांना कायदेशीर जबाबदारीची माहिती मिळावी या करीता पोलीस अधीक्षक  तुषार दोशी  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस वृंदावन मल्टीपर्पज हॉल राधिकारोड सातारा याठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली.

पोलीस अधीक्षक  तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात होणारी ड्रग्ज निर्मितीबाबत तसेच जिल्ह्यात या पुर्वी घडलेल्या घटनेमध्ये झालेली लापरवाहीमुळे गुन्हेगारी व्यक्तींना मिळालेला वाव याबाबत घ्यावयाची काळजी तसेच गावातील दुर्गम ठिकाणे, मोकळे शेड, बंद पडलेले कारखाने, ओसाड वस्ती, जनावरांचे गोठे, अगर इमारती इत्यादी ठिकाणे तसेच अशा ठिकाणाहुन येणारा केमिक्लचा ऊग्रवास आणि संशयास्पद व्यक्तींची रात्री व दिवसा सतत् होणारी ये-जा व संशयास्पद ठिकाणी काचेची भांडी, बर्फाच्या लाद्या, प्लास्टिकची पाईप, ड्रम ईत्यादी साठवनूक केलेले साहित्य यावर लक्ष ठेवून निःपक्षपातीपणाने कर्तव्य करुन वेळोवेळीची माहिती पोलीसांना देणे याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस श्री. संभाजी पाटील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक (एल.एल.एम.) तसेच श्री. वसंत साबळे सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक, यांनी १. महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम महत्वाचे कायदे व तदतुदी. २. पोलीस पाटील अधिनियम महत्वाचे कायदे व तरतुदी ३. फौजदारी प्रकरणात पोलीस पाटीलांनी करावयाची कार्यवाही. ४. शासनाच्या विविध योजनामध्ये पोलीस पाटलांची भुमिका. ५. तंटामुक्ती गाव मोहीम दारुबंदी, गौण खणिज उत्खनन, या मधील पोलीस पाटीलांची भुमिका. ६. नागरीकांना दिला जाणारा अहवाल व दाखल्यांची प्रक्रिया व स्पष्टता. ७. भारतीय दंड संहिता मधील नविन कलमांची माहिती कायदेविषयक सखोल, अभ्यासपुर्ण आणि अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच पोलीस पाटलांच्या समस्या व विचारलेल्या प्रश्नांचे निवारण करण्यात आले.

कार्यशाळेचे आयोजन मा.पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ (जिल्हा विशेष शाखा), सातारा पो.कॉ. चंद्रकांत जाधव, म.पो.कॉ. राधा जगताप, पो.कॉ. सागर खांडेकर जिविशा (सुरक्षा शाखा) यांचेसह इतर पोलीस अंमलदारांनी केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केवायसी न केल्यास पेन्शन बंद; कोरेगाव तालुक्यातील ९२२ लाभार्थ्यांना तहसीलदारांचा इशारा
पुढील बातमी
विश्व काव्य दिनानिमित्त शनिवारी सातार्‍यात गोडोली येथील आयुर्वेदिक गार्डनमध्ये ‘गझल संध्या’ मैफिल

संबंधित बातम्या