मल्हारपेठ परिसरात जुगार अड्ड्यावर धाड; रोकडसह साहित्य जप्त, सातारा शहर पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा : मल्हारपेठ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. छाप्यात 20 हजार 500 रुपयांची रोकड तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
महादेव रजनीकांत शिंदे आणि अनुराग महादेव शिंदे (दोघे रा. मल्हार पेठ, सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मल्हार पेठ परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईत रोकड व अन्य साहित्य आढळून आले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार हसबे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात ब्लिंकिटची सेवा अचानक ठप्प; सर्व्हिस अनअव्हेलेबल मेसेजमुळे सातारकरांची धांदल, मुंडे पॅटर्न चा दणका की तांत्रिक बिघाड?

संबंधित बातम्या