सातारा : प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 40 हजारांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ऐवजामध्ये बंगाली नेकलेस, सोन्याचे गंठण याचा समावेश आहे. याप्रकरणी सौ.हर्षदा चंद्रकांत मोरे (वय 33, रा. मुंबई) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.